Top News

हेरवाडमध्ये नागपंचमीनिमित्त धनगरी ढोल वादन स्पर्धेचे आयोजन

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथे नागपंचमीनिमित्त शनिवार दि.19 रोजी रात्री 9 वाजता येथील तिरंगा चौक येथे भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील स्पर्धक सहभागी होणार असून प्रथम क्रमांकास 11 हजार 1, व्दितीय क्रमांकास 7 हजार 1, तृतीय क्रमांकास 5 हजार 1, चतुर्थ क्रमांकास 3 हजार 1, पाचवा क्रमांकास 2 हजार 1 अशी बक्षीसे ठेवण्यात आली असून यासाठी 1101 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली. 

थोडे नवीन जरा जुने