Top News

माणकापूर मध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन मानकापुरात विविध कार्यक्रमाने साजरा

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

   स्वतंत्र भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मानकापुरातील ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी मराठी शाळा,मानकापूर पि के पी एस, संस्था, अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संघ मल्टीस्टेट,बिरेश्वर बँक,सिद्धेश्वर सोसायटी,ज्ञानेश्वर माऊली पतसंस्था तसेच मानकापूर अंतर्गत मानकापूर कसनाळ हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने यावर्षीचा स्वतंत्र दिन अति उत्साहात संपन्न झाला.

मानकापूर ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी निपाणी शैक्षणिक विभाग अंतर्गत मानकापूर मधील सरकारी व खाजगी शाळेमध्ये एसडीएमसीचे अध्यक्ष व शिक्षक यांच्यावतीने ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

        यावेळी मानकापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष अश्विनी नरबळ, ग्राम विकास अधिकारी पप्पेसर, माझी ग्रामपंचायत अध्यक्ष अभय चौगुले, ग्रामपंचायत सदस्य कविता लोंढे , जयश्री पुजारी ,राजश्री चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य अनुराधा चौगुले, स्नेहल छत्रे, अलका चौगुले, रूपाली चौगुले, मुकुंद कुलकर्णी, सचिन बेडकीहाळे, जयसिंग लोंढे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष वैशाली कुंभार, धनंजय चौगुले, जयपाल चौगुले, धनंजय माळी, प्रमोद माळी, आनंदा मोरे, शाहीर कुंभार, प्रकाश करडे, संदीप बनने, राजीव कुंभार यांच्यासह मानकापूर सरकारी व खाजगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व एसडीएमसी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने