अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कारदगा, तालुका निपाणी गावचे सुपुत्र डॉ. श्री शितल महावीर पाटील यांनी वर्ल्ड फेमस “ बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलाणी” (BITS Pilani) येथून मेकॅनिकल इंजीनियरिंग या विभागात कार्यरत असुन त्यांनी , कंडिशन मॉनिटरिंग ऑफ मिसअलाईड रोटर सिस्टिम्स अँड द प्रेडिक्शन ऑफ रिमेनिंग यूजफुल लाइफ ऑफ रोलिंग इलेमेंट बेअरींगस” यावर शोधप्रबंध सादर करून पीएचडी पदवी संपादन करुन कारदगा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे
डॉ. शितल पाटील यांनी आपल्या संशोधन काळात विविध वर्ल्ड फेमस प्रकाशनामध्ये आपले संशोधन सादर केले आहे. त्यांच्या योगदानाची दखल जगमान्य संस्थांनी, अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स (ASME), प्रायोगिक तंत्रे आणि जर्नल ऑफ व्हायब्रेशन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांनी घेतली आहे. ह्या भरीव कामगिरीमुळे डॉ. शितल पाटील हे एक उत्कृष्ट संशोधक म्हणून नावाजले जात आहेत. भारत सरकारने देखील “पंतप्रधान फेलोशिप ” म्हणून सन्मानित केले. राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणारे डॉ. शितल पाटील हे बिट्स पिलाणी मधले पहिले संशोधक ठरले. या पुरस्काराने बिट्स पिलाणी व डॉ. शितल पाटील यांच्या शिरपेचात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला.
सध्या डॉ. शितल पाटील हे Artificial Intelligence तज्ञ म्हणून जर्मन बॉश (BOSCH, Bangalore) कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन कौशल्य व अनुभव याचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञान बनविण्यामध्ये ते पूर्णवेळ व्यस्त आहेत. त्यांचा बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रॅक, दुबई येथील प्राध्यापक पदाचा अनुभव देखील नोंद करण्यासारखा आहे. कारण सध्या ते संशोधक तसेच एक कुशल मार्गदर्शक म्हणून Bosch मध्ये योगदान देत आहेत. त्यांना या पीएचडी प्रवासात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अमोल मराठे आणि डॉ. अरुण जलान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पिलाणी येथे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे चीफ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या हस्ते पदवीदान समारंभ पार पडला.
शितल पाटील हे एका शेतकरी कुटुंब व ग्रामीणतील असुन त्यानी आज ख्यातनाम संशोधक पर्यंत गरुड झेप घेवुन तरुण पिढी समोर एक आदर्श निर्माण केला आहे. वडील महावीर पाटील, आई उज्वला पाटील यांच्या संस्कारातून डॉ. शितल पाटील यांचे व्यक्तिमत्त्व घडून पी.एच.डी पर्यंत यशाचे शिखर गाठल्याने. त्यांचे कौतुक केले जात आहे.
