भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे तहसिलदारांना निवेदन
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथे गेल्या अनेक महिन्यापासून तलाठी आणि कोतवाल नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हेरवाड मधील सामाजिक कार्यकर्ते व नागरीक महापुराच्या पाण्यात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे तातडीने हेरवाड गावाला तलाठीची नियुक्ती करुन सदरचे आंदोलन थांबवण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने नूतन तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.निवेनात म्हटले आहे की, शासनाला अपेक्षित असणार्या सुशासनाचे आपल्याकडून अपेक्षा आहे. हेरवाड गावाला कायमस्वरुपी तलाठी व कोतवाल मिळावे, यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, नागरीक महापुराच्या पाण्यात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हेरवाडसाठी तलाठी व कोतवाल मागणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार मागणी देखील करण्यात आली आहे. या मागणीस प्रतिसाद न मिळाल्यामुळे गावातील नागरीकांनी महापुराच्या पाण्यात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून तातडीने हेरवाड गावासाठी तलाठी आणि कोतवाल देवून सदरचे आंदोलन थांबविण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलन न्यासचे अध्यक्ष दिपक बंडगर, हेरवाडचे माजी उपसरपंच देवगोंडा आलासे, तेरवाडचे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बंडगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
