शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
प्रवासी घेण्यावरून मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शिरोळ तहसील कार्यालयासमोरच प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोघा वाहनचालकांत हाणामारी झाली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरोळ पोलीस ठाण्यासमोरील प्रमुख मार्गावर घडला.
जयसिंगपूरहून शिरोळकडे परवानाधारक काळीपिवळी टाटा मॅजिक टेम्पो प्रवासी घेऊन शिरोळ पोलीस ठाण्यानजीक आला. यावेळी शिरोळ कचेरी थांब्यावरील काही प्रवासी त्या टेम्पो वाहनात चढले. त्याचदरम्यान जयसिंगपूरहून शिरोळकडे प्रवासी घेऊन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा मॅजिक खासगी टेम्पोचालकाने त्या परवानाधारक काळीपिवळी टेम्पो वाहनासमोर आपले वाहन उभे करून प्रवासी का घेतलेस, अशी विचारणा केली. त्यावेळी दोन्ही वाहनचालकोत शाब्दिक बाचाबाची होऊन काही क्षणातच भररस्त्यावर हाणामारी सुरू झाली. नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र एकमेकाला बघून घेण्याची भाषा आणि प्रवासी घेण्यावरून झालेला हा वाद रंगला होता.
