Top News

शिरोळमध्ये मोटरसायकलच्या धडकेत महिला जखमी


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ-अर्जुनवाड रोडवर अज्ञात मोटरसायकल धारकाने चालत जाणार्‍या महिलेला जोराची धडक दिल्याने या अपघातात महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद जखमी रुपाली निवास परीट वय 25 रा, टाकळी मळा अर्जुनवाड रोड शिरोळ यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी रुपाली परीट या कामावरुन घरी पायी चालत जात असताना शिरोळ ते अर्जुनवाड रोडवर प्रगती इंजिनिअरिंग जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना समोरुन धडक दिली. या अपघातात परीट यांच्या हाताला, पायाला आणि चेहर्‍यावर दुखापत झाली. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी अज्ञात मोटरसायकल स्वाराविरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडे नवीन जरा जुने