Top News

सत्ताधारी गटाकडून सुकुमार पाटील यांचा अर्ज दाखल

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

विरोधी गटातील नाराज विरोधी पक्षनेते सुकुमार पाटील यांनी सत्ताधारी गटाकडून प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील लढत रंगतदार होणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणूकीत सुकुमार पाटील यांनी किंगमेकरची भूमिका बजावली होती. त्यामुळे ते विरोधी पक्षनेते बनले होते. मात्र कालांतराने सुकुमार पाटील हे नाराज होवून सत्ताधारी गटात सामील झाले. आणि पुन्हा विकास कामांच्या जोरावर त्यांनी सत्ताधारी आर.बी. पाटील गटाकडून प्रभाग ३ मधून निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

थोडे नवीन जरा जुने