सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सलग दोन दिवस सुरू असलेल्या श्री बुवाफन महाराज उत्सव सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवारी (दि १६ ) पासून हजरत नूरखान बादशाह उरुसास प्रारंभ झाला आहे, बुधवारी रात्री पारंपरिक मानकरी, भाविक यांच्या उपस्थितीत हजरत नूरखान बादशाह दर्ग्यात गंधरात्र सोहळा संपन्न झाला, यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती, दरम्यान आज गुरुवारी उरुसाचा मुख्य दिवस असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.
येथील बसस्थानक नजीक असणाऱ्या हजरत नूरखान बादशाह उरुसाला प्रारंभ झाला असून बुधवारी सकाळी दर्ग्याचे पुजारी बशीर शेख ( देवर्षी ) यांच्या हस्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीत दर्ग्यामध्ये विधिवत पूजा झाली, त्यानंतर बुधवारी सायंकाळी चर्मकार समाज व पारंपारिक मानकरी, भाविक यांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. रात्री आठ वाजता हजरत नूरखान बादशहास चर्मकार समाजातील मानाचा गंध लावणे व गलेफ घालणे सोहळा पार पडला.
दरम्यान, या धार्मिक सोहळ्यास चर्मकार समाजातील मानकरी नायकू माने, दगडू माने ,शिवाजी माने, शंकर माने यांच्यासह नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दिलावर कुरणे,बशीर शेख देवर्षी, अजिंक्य पाटील, सुलतान शेख देवर्षी, परवेज मेस्त्री, श्री भाट, लाला माने, विनायक माने, प्रवीण जगदाळे,राजाराम माने, गंगाराम माने, अजित कुरणे, श्रीकांत पाटील, विश्वजीत शिंदे, नेताजी पाटील तसेच माजी सरपंच दरगू गावडे , अभिजीत माने, विठ्ठल पाटील ,दादासाहेब इंगळे, बबन पुजारी, बाळासाहेब कोळी ,बापूसो गंगधर, फत्तेलाल मिस्त्री, देवाप्पा पुजारी, शिवाजीराव माने- देशमुख, अमोल मोहिते, अमरसिंह कांबळे, सुरेश खडके, नामदेव सनके ,बाजीराव कोळी, सर्जेराव पुंदे, पिंटू माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, अजिंक्यतारा मंडळ उरूस समितीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले आहे, गुरुवारी उरुसाचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांनी दंडवत घालून दर्ग्यात दर्शन घेतले, यावेळी उरूस समितीच्या स्वयंसेवकामार्फत भाविकांना रांगेतून दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
