Top News

बाळासाब अकिवाटे यांचे निधन

 


बोरगांव : 

बोरगाव येथील कोळी समाजाचे कार्यकर्ते, केबल नेटवर्क क्षेत्रातील अतिशय हुशार व्यक्तीमत्व, फिरोज केबल नेटवर्कचे कर्मचारी, श्री बाळासाब रावसाहेब अकिवाटे. यांचे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२.रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.ते ३८ वर्षाचे होते.

     बाळु यांचा स्वभाव मनमिळाऊ होता, केबल कामाने बाळु सर्वत्र परिचयाचे होते. त्यामुळे केबल बाळु या नावाने ते ओळखले जात असत.

   त्यांच्या पश्चात आई,पत्नि, मुलगा, भाऊ, चुलते असा परिवार आहे, त्यांच्या निधनाचे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता बोरगाव येथे होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने