Top News

पुराचा धोका कायम ; राधानगरीचे चार दरवाजे खुले

 




शिवार न्यूज नेटवर्क :

जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने पूरपरिस्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरु आहे.

यामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा आज, पहाटे खुला झाला. एकूण सात दरवाज्या पैकी पहाटे 5:30 वाजता 6 नंबरचा दरवाजा खुला झाला. यानंतर सकाळी 8.55 वाजता गेट क्रमांक 5 खुले झाले. दुपारी 2:20 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला. यानंतर दुपारी 3:20 वाजता चौथा दरवाजा उघडला. असे एकूण 3, 4, 5, 6 नंबरचे चार दरवाजे उघडले आहेत. या चार दरवाज्यातून 5712 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक असा एकूण 7312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखीन दरवाजे सुरू होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने