दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड येथील हिंस्र कुत्र्यांच्या हल्ल्यात जीवदान मिळालेल्या अपूर्वा शिरढोणे या मुलीच्या उपचार व इतर खर्चासाठी अपूर्वाची वडील आणी आजी यांच्याकडे २७३०० रु रोख रक्कम आदिनाथ होसकल्ले. सुरेश रेडेकर शितल खोत यांच्यामार्फत दवाखान्यात सुपूर्त करण्यात आली. मदतीच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून सैनिक टाकळी येथील
उद्योगपती अविनाश मगदूम यांच्या प्रयत्नातून जयसिंगपूर येथील त्यांचे सासरे बिल्डर्स आदिनाथ होसकल्ले व त्यांचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत ज्वेलर्स चंदुकाका सराफ यांनी अपूर्वा बद्दल सखोल माहिती घेऊन मदतीची गरज असणाऱ्या अपूर्वाच्या उपचारांसाठी भरीव मदत केली. त्याचबरोबर अतुल भाई शहा, पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योगपती आशिषजी शहा आनंद शहा तसेच जयसिंगपूर येथील बांधकाम व्यावसायिक रविंद्र कागवाडे तसेच अनेक मोठ्या व्यक्तींच्याकडून मदत जमा होत आहे . घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची
आणि आईविना पोरक्या असणाऱ्या मुलीला उपचारासाठी मदतीचा ओघ वाढायला हवा. मुलीचे भावी आयुष्य व शिक्षणासाठी देखील वेगवेगळ्या स्तरातून मदत होणे गरजेचे आहे. सैनिक टाकळी चे उद्योगपती अविनाश मगदूम व बिल्डर आदिनाथ होसकल्ले यांच्या टिमच्या प्रयत्नातून जमा झालेली मदत रुपी रक्कम २७३०० रोख जखमी अपूर्वा शिरढोणे हिचे वडील आणि आजी यांच्याकडे आज रोजी सुपूर्त करण्यात आली. अपूर्वा साठी चंदुकाका सराफ यांच्याकडून बारामती मधून मदत मिळते तर आपणाकडून का नाही? शिरोळ तालुक्यातील दानशूर व्यक्ती, सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, नेते, आणि कार्यकर्ते आपण समाजासाठी बरच काही करतो. असे ज्यांना वाटते.( दिखावा करणारे सोडून) त्यांच्याकडूनही आणखीन मदत आणि पुन्हा नवी घटना घडण्याआधी हिंस्र झालेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. दानशूर देणगीदार आणि उद्योगपतीअविनाश मगदूम व आदिनाथ होसकल्लेसह टिमचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
