Top News

हेरवाडमध्ये माजी सुभेदार लकाप्पा अकिवाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हेरवाड सह परिसरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हेरवाड ग्रामपंचायतीने ध्वजारोहण करण्याचा मान गावातील माजी सुभेदार लकाप्पा अकिवाटे यांना देण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिक, सरपंच व पदाधिकारी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच गावतील पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय धोत्रे यांनी केले. 

यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील, आर.बी. पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार, माजी सुभेदार लकाप्पा अकिवाटे, सुवर्णा अपराज, ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, महावितरणचे अधिकारी सर्व सेवा संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने