इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी येथील शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष श्री महेंद्र बालर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
या वेळी शाळेच्या मुलांनी देशभक्ती पर गाणी गायन केले. त्याच बरोबर मुलांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर अत्यंत सुंदर भाषणे केली. तसेच या वेळी 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शाळेतील मुलांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त पथनाट्य व लेझीम याचे उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले. .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वारे यांनी केले . पाहुण्याची ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शिवूडकर सर यांनी मानले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे संचालक, संदीप सुतार, श्री ईश्वर सेवा मंडळाच्या संचालिका वर्षा गोरे (हाळवणकर ), शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील यांच्यासह पालक वर्ग ,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
