Top News

बोरगाव कोडीसिद्धेश्वर मंदिर येथे धाडसी चोरी

 सहा तोळे सोने, तीन किलो चांदी सह पंचवीस हजारांचा रोकड लंपास


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  शहरातील सोबाने मळा येथील जागृत देवस्थान श्री कोडी सिद्धेश्वर मंदिरात चोरी झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली.या चोरीमध्ये मंदिरातील सुमारे सहा तोळे सोने, तीन किलो चांदी व 25 हजार रोकड सह दानपेट्या चोरी झाली असून सुमारे सहा लाखांवर चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शहरातील सोबाणे मळा येथे श्री कोडीसिद्धेश्वर देवाचे मंदिर आहे. अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर बोरगाव इचलकरंजी रस्त्यापासून सुमारे दीड किलोमीटर आता आहे. शेतातच मंदिर असल्याने मंदिराच्या भोवती ऊस पीक आहे. मंदिरात रात्रीच्या वेळी कोणीच नसते याचा फायदा घेऊन रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचे मुख्य द्वार कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरात असलेली तिजोरी उघडून तेथे असलेले रोकड लंपास केले. त्यानंतर गर्भ मंदिरात प्रवेश करून देवावर असलेले दागिने व चांदीही चोरले आहेत. त्याचबरोबर एक दानपेटीतील रक्कम घेऊन दुसरी दानपेटी ही चोरले आहेत. सुमारे सहा तोळे सोने, तीन किलो चांदी व 25 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

सोमवारी सकाळी येथील नागरिक व पुजारी देवाची पूजा करण्यास आले असता मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. नागरिकांनी तातडीने युवा नेते उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. युवा नेते उत्तम पाटील यांनी लागलीच पोलिसांना याबाबत कळवून चोरीचा छडा कोणत्याही परिस्थितीत लागला पाहिजे असा आग्रह धरला .या वेळी पोलीस अधीक्षक बसवराज येलीगार, वृत्त निरीक्षक संगमेश शिवयोगी , निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मोठ्या प्रमाणात दागिने व चांदीचे दागिने चोरी गेल्याने पोलिसांनी श्वान दलाच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला .बेळगाव येथील चारू नावाच्या श्वान घटनास्थळावरून पाचारण करण्यात आले .ते श्वान काही अंतरावरच जाऊन थांबले . मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांनी आपली तपासणी गतिमान केली असून कर्नाटका बरोबरच महाराष्ट्र येथेही पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहेत.


थोडे नवीन जरा जुने