Top News

अर्जुनवाड येथे रुपेशकुमार यादव यांचा सत्कार

 


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

     केंद्रीय जल आयोगाचे कनिष्ठ अभियंता रुपेशकुमार यादव यांची बिहार ( पाटणा ) येथे बदली झाल्या बद्दल येथील कार्याल्यात मधील कुशल कार्य सहाय्यक रावसाहेब माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कनिष्ठ अभियंता कुमारी कोमल पाटील होत्या.

    या वेळी कुशल कार्य सहाय्यक उद्धव मगदूम व रुपेश कुमार यादव यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक गणेश डोंगरे सूत्रसंचालन योगेश कोळी आणि आभार राहुल डोंगरे यांनी मानले यावेळी कुरुंदवाड केंद्राचे कुशल कार्य सहाय्यक एम. बी. कांबळे, संताजी मगदूम आदी उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने