अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :
बाहुबली विद्यापीठाचे श्री विद्यासागर हायस्कूल , अकिवाट येथील इ.१०वीचा ९८% निकाल लागला आहे.विद्यालयातून १० वी परीक्षेत एकूण १०० विद्यार्थी बसले त्यापैकी ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कु.सानिका वृषभनाथ गजन्नवर हिने ९०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, अर्थव दत्तात्रय कदम याने ८८% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर कु प्रतिक्षा बाळासो शिरगुप्पे हिने ८७.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचा शाळेचे मुख्याध्यापक डी.बी.वाडकर सर सर्व अध्यापक अध्यापिकांनी सत्कार केला . शाळेचे स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकर चौगुले
डी.जे.कल्लण्णावर गुरुजी , आदिनाथ होसकल्ले ,शालेय समितीचे सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व स्तरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे
