हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या आठ महिन्यापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या परिवारावर आर्थिक डोंगर कोसळला आहे.या बाबतचे वृत्त शिवार न्यूज नेटवर्कने प्रसारित केल्यानंतर ' विकास हेरवाडचा' या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
हेरवाड येथील काडगोंडा खडके या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने खडके परिवारावर आर्थिक डोंगर कोसळला आहे.याची दखल घेवून शिवार न्यूज नेटवर्कने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे, "मैत्री फौंडेशन "चे चंद्रकांत छाजेड,जानकी वृद्धाश्रमचे- बाबासो पुजारी, सामाजिक कार्यकर्ते -अर्जुन जाधव, पत्रकार संतोष तारळे, कॉ.शिवाजी माळी,भरत पवार,सुहासराव नेर्ले, हाजी मेहबूब बादशहा मुजावर सर,डॉ.अविनाश सुतार, लखन माने,संभाजी सिद सर यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
