Top News

शिरोळ येथे राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शंभर वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या राजर्षी शाहू वाचनालयाने आदर्शवत अशी प्रगती साधली आहे, या वाचनालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निश्चितपणे उपयोगी ठरतील.

शहरामध्ये नगरपरिषदेच्या फंडातून प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यामुळे शहराची सुद्धा सुरक्षा वाढणार आहे, असे मत शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी व्यक्त केले.

           येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर या ठिकाणी शुक्रवारी बसविण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे उदघाटन शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले,यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा आण्णासाहेब माने -गावडे यांनी स्वागत केले, उपाध्यक्ष एम एस माने यांनी प्रास्ताविक केले.

    यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळ शहरामध्ये नगरपरिषदेच्या फंडातून प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, यामुळे शहराची सुद्धा सुरक्षा वाढणार आहे, वाचनालयाच्या भौतिक सुविधा करिता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही पाटील यांनी दिले.

   या समारंभास वाचनालयाचे माजी अध्यक्ष एल. एफ. पाटील माजी सरपंच दरगु गावडे, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, जयसिंगपूर बाजार समितीचे माजी सभापती.विजयसिंह माने,- वाचनालयाचे संचालक पंडित काळे, सौ.जयश्री पाटील, एन.वाय.जाधव, बी जी. माने,.चंद्रकांत गावडे सचिन माळी,आनंदराव माने-देशमुख, धनाजीराव जाधव,रामचंद्र पाटील, अशोकराव गंगधर, पत्रकार दगडू माने, ग्रंथपाल संभाजी चव्हाण यांच्यासह वाचक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने