Top News

तेरवाड बंधार्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धारेवर

 स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 


तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

रसायनमुक्त व मैलामिश्रित पाण्यामुळे पंचगंगा नदी पात्रातील हजारो मासे मृत झाले आहेत. याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तेरवाड बंधाऱ्यावर पाण्याचे नमुने घेणे करिता दाखल झाले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापर्यंत कारवाई करू असे सांगितल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांत झाले. 

गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न नदी काठावरील गावांना सतावत आहे. गेल्या दोन दिवसापासून नदीपात्रात प्रदूषणवाढल्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मृत झाली होती. याची दखल घेऊन आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्यावर भेट देऊन प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उद्यापर्यंत संबंधित घटकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांत झाले. 

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, कऱ्यापा ईटाज यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, प्रत्येक वेळी प्रदूषणामुळे पंचगंगा नदी पात्रातील हजारो मासे मृत होतात... यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतात पाण्याचे नमुने घेतात आणि कोणतीच ठोस कारवाई होत नसल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्‍न कायम पंचगंगा नदी काठावरील गावांना सतावत आहे. ज्या त्या वेळी संबंधित घटकावर ठोस कारवाई झाली असती तर आज हजारो मासे मृत झाली नसती, अशी प्रतिक्रिया नदीकाठावरील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी तेरवाड बंधाऱ्यावर भेट देऊन पंचगंगेच्या प्रदूषणाची माहिती घेतली होती. त्यांनी तात्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाण्याचे नमुने घेणे करिता तसेच संबंधित घटकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तेरवाड बंधाऱ्यावर दाखल झाले होते.

थोडे नवीन जरा जुने