जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
उद्योग व्यवसायाचे महत्त्व ओळखून तरुण उद्योजक आकाश जगन्नाथ शिंदे (मालेकर ) या तरुणाने जयसिंगपूर येथे शिरोळ- वाडी मार्गावरील परिसरात आकाश सैन्डविच कॉर्नर या नव्याने व्यवसाय सुरू केला, या फर्म चा उदघाटन शुभारंभ जयसिंगपूर च्या माजी नगराध्यक्षा डॉ निता अभिजित माने व जयसिंगपूर चे माजी नगरसेवक पराग दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष डॉ माने म्हणाल्या, कष्ट करण्याची तयारी असली की छोट्या उद्योग व्यवसायातून मोठे करिअर करता येते, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आकाश शिंदे यांनी या व्यवसायातून मोठी प्रगती साधावी, सॅंडविच यासह अन्य खाद्य पदार्थ विक्री करताना ग्राहकांची पसंती, गुणवत्ता व दर्जा यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगून त्यांनी आकाश सैन्डविच कॉर्नर जयसिंगपूर चे मोठे खाद्यसंस्कृतीचे दालन ठरावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक पराग पाटील व दगडू माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन उद्योजक शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या, जयसिंगपुरातील शिरोळ- वाडी रोड येथे नव्याने सुरू झालेल्या आकाश सैन्डविच कॉर्नर सेंटरला सामाजिक कार्यकर्ते किरण काळे, प्रदीप आयगोळे, वैभव माने, सुरेंद्र तिवडे, संतोष माने, शंकर माने , जगन्नाथ शिंदे ,सखुबाई शिंदे, राहुल शिंदे, कविता माने, सानिका माने, चंदू माने व ग्राहक उपस्थित होते.
