सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :
शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरास अनेक ठिकाणी तडे गेले आहेत तर काही ठिकाणी मंदिराच्या पायथ्याचे दगड खचले आहेत याची वेळीच दखल घेतली नाही तर मंदिराचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे . यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले . ते येथील मंदिर भेटी प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी आमदार उल्हासदादा पाटील म्हणाले, दोन वेळा आलेल्या प्रचंड महापुरामुळे मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. जागतिक दर्जाचे शिल्पकला असलेल्या या मंदिराचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुरातत्व खाते यांचा समन्वय ठेवून लवकरात लवकर या मंदिरासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी आपण पक्षीय पातळीवर त प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, आण्णासाहेब बिलुरे, युवराज घोरपडे , युवा सेनेचे मंगेश पाटील, निलेश तवंदकर, प्रतिक धनवडे, अमित कदम,संजय अणुसे,बाळु देसाई,कृष्णा कोळी,शिलेदार सर,सागर परीट,प्रकाश पाटील,शिवानंद पाटील,दत्ता कामत. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
