अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सदलगा विभाग पत्रकार संघाची सन 2022-23 या एक वर्षाच्या सालाकरिता नूतन कार्यकारिणी जाहीर झाली यामध्ये मांगुरचे पत्रकार तानाजी बिरनाळे यांची अध्यक्षपदी येडूरचे ज्येष्ठ पत्रकार विष्णू शिंगाडे यांची उपाध्यक्षपदी सदलगा येथील पत्रकार तानाजी पवार यांची सेक्रेटरी पदी तर गळतगा येथील पत्रकार वैभव खोत यांची खजिनदार पदी बिनविरोध निवड झाली.
बोरगाव येथे पार पडलेल्या पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी प्रसंगी ही निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षस्थानी सदलगा विभाग पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी भोरे हे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कोळी यांनी केले.यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
या निवडी प्रसंगी नूतन अध्यक्ष तानाजी बिरनाळे म्हणाले की आज सर्वानुमते आमच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून येणाऱ्या काळात सर्वांच्या सहकार्याने पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जी सामाजिक कार्य सामाजिक उपक्रम राबवता येथील ती प्रामाणिकपणे राबवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
या बैठकीत प्रसंगी माजी अध्यक्ष शिवाजी भोरे, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कोळी, सुभाष बदनीकाई संतोष कामत शामलिंग किल्लेदार महादेव पाटील, गजानन पाटील सुधीर कुंभोजकर अजित शिंदे कुमार संकपाळ अनंत दिक्षित कृष्णा आरगे विनायक म्हेत्रे, विपुल ढेरे सुयोग किल्लेदार सुशांत किल्लेदार अजित सुतार अजित कांबळे लीना संकपाळ उत्तम काटकर राजू जाधव संजय कुलकर्णी, राहुल वराळे यांच्यासह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.