Top News

कै.नाथबाबा वाळकुंजे यांच्या पुण्यतिथी निमित्त जेवण वाटप

 कै.नाथबाबा वाळकुंजे यांच्या पुण्यतिथी निमित्त जेवण वाटप

दानोळी/ शिवार न्यूज नेटवर्क :

 दानोळी येथील जनसेवा सोसायटीच्या माध्यमातून पंचायत समितीचे माजी सभापती व जनसेवा संस्थेचे आधारस्तंभ कै.नाथबाबा वाळकुंजे यांच्या नवव्या पुण्यस्मरणा निमित्त दानोळी परिसरातील सर्व ऊसतोड मजुरांना जेवण वाटप करण्यात आले.

     कै.नाथबाबा वाळकुंजे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त गेली अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान, रुग्णालयात फळे वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रम वर्षभरात राबवले जातात तर यावर्षी गेली चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या खोपित पाणी शिरल्याने व पावसामुळे ऊस तोडीचे काम बंद पडले आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे हे गांभीर्य लक्षात घेता येथील जनसेवा संस्थेच्या माध्यमातून सुमारे 25 हुन अधिक असलेल्या टोळ्यातील सहाशे ते सातशे मजुरांना एकवेळचे जेवण वाटप करण्यात आले यावेळी मजुरांनी या संस्थेचे आभार व्यक्त केले.हे जेवण वाटप जयसिंगपुर रोडवरील पेट्रोल पंपावर करण्यात आले.



 यावेळी जनसेवा दूध संस्थेचे चेअरमन धन्यकुमार पराज,असिफ तांबोळी, कुबेर केकले,उदय राऊत,कुबेर वाळकुंजे,आचारी रमेश मल्लाडे,शेती मदतनीस अजित क्षेत्राप्पा,नंदकुमार शिंदे,दिलीप ठोंबरे,राजू दळवी,सागर बिनीवाले,पवन केकले,महावीर चिपरे, वृषभ बिनीवले,शरद पाटील,संदेश चौगुले यांच्या सह सभासद उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने