जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
पैश्यांच्या देवाण घेवणीवरून दानोळी (ता. शिरोळ) येथील प्रशांत संजय भिसे या तरुणाच्या खून प्रकरणी संशयित प्रताप उर्फ गुंड्या संजय माने, अमोल ऊर्फ दाद्या दत्ता हराळे व सागर अजित होगले (सर्व रा.दानोळी) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे त्यांनी युक्तिवाद केला. बुधवारी मृत प्रशांत भिसेसह, प्रताप माने, सागर होगले, अमोल हराळे तिघे संशयीत जेवण्यासाठी गेले होते. यावेळी संशयीतांनी संगणमत करून पैसे देण्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने खुन केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कोथळी येथील गायराण जमीवर असलेल्या कचरा डेपोमध्ये टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळलेला राहिला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली होती. याप्रकरणी तिघा संशयिताना अटक केली असून त्यांना आज येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.