Top News

ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्या सचिवपदी येथील कवी प्रा.दिलीप सुतार यांची निवड

 कुरूंदवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :

अब्दुललाट ता. शिरोळ येथील ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्या सचिवपदी  येथील कवी प्रा.दिलीप सुतार यांची  निवड


करण्यात आली आहे.

देश व महाराष्ट्र  पातळीवर मानवीहक्कांचे रक्षण संवर्धन व जात पात, धर्म, पंथ विरहित समस्त मानव जातीचे कल्याण या उदात्त हेतूने प्रेरित भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यानी  या फाऊंडेशनची सुरूवात केली आहे.

या फाऊंडेशनचे प्रमुख केंद्र असलेल्या ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्यावतीने देशभर युवक, युवती व देशवाशीयांच्या मनांत सकारात्मकता रूजविण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक,  शैक्षणिक,साहित्यिक  विधायक उपक्रमांचे आयोजन करणेत येते.

ज्ञानेश्वर मुळे फौ़डेशनच्या कार्याविषयी माहिती देताना नूतन सचिव, प्रा. दिलीप सुतार म्हणाले की, फौंडेशनच्या वतीने महापूर, भूकंप व कोरोना काळात आपत्ती ग्रस्ताना  व दूर्गम भागातील आदिवासी नागरिकांना विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे तर युवकासाठी विविधप्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, दिल्ली व परिसरातील काही विद्यापीठात सकारात्मकता  अभ्यासक्रम सुरू करणेसाठी  खास प्रयत्न केले. विविध प्रकारच्या ललितकला साहित्य वाचन संस्क्रुती व व्यक्तीमत्व विकास ,  भारतीय संविधान विषयक जनजागरण तसेच पर्यावरणपूरक,सेंद्रीय शेती ग्रामीण व शहरी महिला सबलीकरणार्थ उद्योग व्यवसाय,इ.क्षेत्रातील  नामवंत व्यक्तींच्या  प्रत्यक्ष गाठीभेटी,मुलाखती, ट्रान्सजेंडर्स किंवा त्रुतीयपंथी यांच्या सामाजिक प्रश्नानां समर्पित आगळा वेगऴा 2021चा खास दिवाळी अंक, अशा छोट्यामोठ्या 350पेक्षा अधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणेत आले आहे. 

थोडे नवीन जरा जुने