Top News

गुरुदत्त शुगर्स परिसरात कन्नड वेदिकेच्या झेंड्याची होळी

 अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :

 बेंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ अकिवाट (ता.शिरोळ) येथे गुरुदत्त शुगर्स परिसरामध्ये कर्नाटकातून आलेल्या ट्रॅक्टरला असलेल्या कन्नड वेदिकेचा झेंडा येथील शिवसैनिकांनी काढून पेटवला. येथुन पुढे कानडी झेंडा महाराष्ट्रात फडकवू देणार नाही, असा इशारा युवासेना तालुका समन्वयक निलेश तवंदकर यांनी दिला आहे.

बंगळूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी कर्नाटक शासनाचा निषेध व्यक्त होत आहे. त्याचाच भाग म्हणून अकिवाट


येथील श्री गुरुदत्त शुगर्सकडे कर्नाटकातून येणाऱ्या ट्रॅक्टरला असणारे कन्नड वेदिकेचे झेंडे शिवसैनिकांनी काढून त्याची होळी केली. शिवसैनिकांनी घटनेचा निषेध व्यक्त करून यापुढे महाराष्ट्रात कर्नाटक वेदिकेचा झेंडा फडकवू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी शिवसेना विभागप्रमुख उत्तमसिंग रजपूत, पांडूसिंग रजपूत, निग्गाप्पा कट्टेकरी, युवासेना शहर अधिकारी पृथ्वी रजपूत, सौरभ शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने