Top News

अकिवाटच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आरोग्यमंत्री यड्रावकर

 अकिवाटमध्ये ३३ लाखांच्या विकास कामांचा आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ


अकिवाट/ शिवार न्यूज नेटवर्क :


          रविवारी अकिवाट येथे नामदार श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून शासनाच्या 2515 योजनेअंतर्गत व आमदारांच्या स्थानिक विकास निधी मधून विविध विकास कामांचा शुभारंभ नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला,२५१५ योजनेमधून येथील महादेव मंदिराचे कंपाऊंड उभारणे यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता, त्याचबरोबर रस्त्यासाठी दहा लाख तर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या स्थानिक आमदार विकास निधी मधून मुस्लिम समाज सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी 13 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता, एकूण 33 लाख रुपयांच्या या सर्व कामांचा शुभारंभ यावेळी संपन्न झाला.
      अकिवाटला या पुढच्या काळात देखील विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी दिली.

     या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार, बाबासो उमाजे,विशाल आवटी, आप्पासो बडबडे, आप्पासो दानोळे, भूपाल रायनाडे, बाळासो रायनाडे, अण्णासो हसुरे, गणपती कागे, अकिवाट चे सरपंच विशाल चौगुले,रावसो आवटी, आण्‍णासो पानदारे,आप्पासो आंबी,ताजुद्दीन तहसीलदार, जहांगीर तहसीलदार, जावेद तहसीलदार, युनूस तहसीलदार,नौशाद मकानदार, आलीसाब मुल्ला,अजिज बहिरूपी, बापूसो सनदी, सुजित रायणाडे, तानाजी हुजरे, गुलाब तांबोळी, आयुब सनदी, साबीर शेख, विठ्ठल गायकवाड, यासीन तांबोळी, बाबासो चिक्कोडे, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने