हाफिज इर्षाद शेख युवा समाजगौरव पुरस्काराने सन्मानित
हुपरी/ शिवार न्यूज नेटवर्क :
हुपरी येथील हाफिज ईर्षाद शेख यांना स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे स्वराज्य बहुउद्देशीय युवा सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
सर्व जातीच्या 27 गरीब कुटुंबांना प्रत्यक महिन्याला अन्न धान्याचे वाटप, अपंग व्यक्तींना 3 चाकी सायकल प्रदान, कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूचे वाटप, पहिल्या वर्धापन दीना निमित्त रक्तदान शिबीराचे अयोजन, गरजू कुटुंबांना दवाखण्यासाठी आर्थिक मदत, कोविड काळात पोलिस मित्रांना जेवण वाटप, थंडीच्या दिवसात रस्त्यावरील फिरत्यांना ब्लंकेट वाटप, महापूरमध्ये अन्नधान्यचे वाटप व प्रत्यक पूरग्रस्त गावात आरोग्य शिबिराचे अयोजन, कोविड काळामध्ये अंत्यविधी व दफन विधी प्रत्यक समाजाचे रीतीरिवाजा नुसार संपन्न, पोलिस स्टेशन मार्फत रक्तदान शिबीर मध्ये सहभाग तसेच सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ व गुणांचा आणि निष्ठावान जागृक नागरिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ईर्षाद शेख यांना स्वराज्य स्वराज्य बहुउद्देशीय समाजकार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा.खा.राजू शेट्टी,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ,पोलिस अधिकारी अजित पाटील, संस्थापक एजाज मुजावर नगरसेवक बजरंग खामकर,पराग पाटील,शैलेश चौगुले,तेजस कुराडे ,शंकर कदम,रौफ पटेल आदी उपस्थित होते.