Top News

बोरगाव नगरपंचायत निवडणूक तिरंगी होणार ?

 


आमदार-खासदार प्रेमी गटाबरोबर उत्तम पाटील, अण्णासाहेब हवले गट आमने-सामने
 

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

27 डिसेंबर रोजी होणाऱ्या बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आमदार खासदार गटाचे सुनील नांगरे- पाटील यांच्याबरोबर युवा नेते उत्तम पाटील व अण्णासाहेब हवले गट निवडणुकीसाठी आमने-सामने निवडणूक लढवणार असल्याची संकेत दिसत असल्याने होणारी बोरगाव नगरपंचायतीची निवडणूक तिरंगी होणार असल्याची संकेत दिसत आहेत.

     गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 27 डिसेंबर अखेर होणारी ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. निपाणी मतदार संघावर भाजपचे राज्य आहे विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांच्याविरोधात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी म्हणून बोरगावचे युवा नेते उत्तम पाटील यांनी मोठी तयारी दाखवली आहे. आणि याचेच प्रतिबिंब म्हणून बोरगाव नगर पंचायतीची हि निवडणूक एकमेकांच्या प्रतिष्ठेची बनलेली आहे. शिवाय दुसरीकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले हेही आपले वर्चस्व दाखवण्याच्या नादात निवडणुकीच्या तयारीला मोठ्या जोमात लागले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे बोरगाव पंचायत निवडणूक तिरंगी होण्याबरोबरच चुरशीची होणार आहे.

    बोरगाव नगर पंचायतीसाठी एकूण 11हजार 744 इतके मतदान असून यापैकी 5 हजार688 महिला, तर 6 हजार 056 इतके पुरुष मतदान असल्याची नोंद आहे. एकूण शहराच्या सतरा प्रभागासाठी 17 उमेदवार रिंगणात उभारणार असून तिन्ही गटा कडूनही निवडणुकीसाठी एका पेक्षा एक उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

        युवा नेते उत्तम पाटील यांनी शहर विकास आघाडीतून नगरपंचायतीवर गेली काही वर्षे सत्ता भोगत असताना अनेक विकास कामे केलेली आहेत.त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार-खासदार गटाकडून ही विशेष फंडातून अनेक विकास कामे शहरासाठी केलेली आहेत.त्यामुळे शहर विकास आघाडी विरोधात आमदार खासदार प्रेमी गट प्रतिस्पर्धी जरी असला तरीही माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांची हि भूमिका तटस्थ असल्याने तेही हि निवडणूक स्व-बळावरच निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे तिन्ही गटाकडून नगरपंचायतीची निवडणूक मोठ्या ताकतीनिशी लढवली जाणार आहे तर सत्तासंघर्ष काबीज करण्याबरोबर आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीसाठी करोडो रुपयांचा चुराडा होणार असल्याचाही अंदाज वर्तवला जात असून तीन हि गटाकडून यासाठी तयारी दर्शविली असल्याचे दिसत आहे त्यामुळे प्रतिष्ठेसाठी लागलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याने लक्ष केंद्रित केले आहे.

थोडे नवीन जरा जुने