नृसिंहवाडी येथे इचलकरंजी- शिरोळ विधानसभा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
दोन वर्षांपूर्वी ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्या सर्व गद्दारांना गाढण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निश्चित जागा दाखवु, असा विश्वास शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
नृसिंहवाडी येथे आयोजित शिरोळ- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद मिळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते संजय पवार होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अरुणभाई दुधवडकर, महाराष्ट्र राज्य संघटक चंगेजखान पठाण, हाजी असलम सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार जाधव म्हणाले "गद्दारांना पाडण्याचे काम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी करून दाखवले आहे. देशात चारसौ पार व राज्यात ४५ प्लस म्हणत होते त्यांना १७ वर आणून ठेवले .आमच्या शिवसैनिकांना ईडी, सी .बी .आय. , इन्कम टॅक्स, पोलिसांचा जाच ,एस. आय. टी. चा त्रास देऊन बेजार केला होता .शिवसेना पक्ष फोडला आणि घमेंडी ने ते डरकाळी फोडत होते. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हा पेटलेला शिवसैनिक त्यांना खाली उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास शेवटी जाधव यांनी व्यक्त केला.
स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी केले. यावेळी किशोर ठाणेकर दयानंद, मालवेकर , मलकारी लवटे , मधुकर पाटील आदींची भाषणे झाली. प्रतिक धनवडे यांनी आभार मानले. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
