Top News

कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर संपन्न.

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 बेडकिहाळ येथील प्राथमिक कन्नड मराठी मुलांची शाळा येथे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे संपूर्ण आयोजन शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले होते. प्रथम शिबीराच्या कार्यक्रमाचे उद्दघाटन मा. शिवाजी पाटील जेष्ठ गुरुजी, प्रकाश किनीकर जेष्ठ साहित्यिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दत्तकुमार पाटील, युवा नेते बेडकिहाळ, डॉ.सुमित्रा भोसले, नंदिनी गारमेट्स च्या संस्थापिका यशस्वी उद्योजिका कोल्हापूर, अशोक झेंडे, ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ, ग्राम पंचायत अध्यक्षा सौ मेघा मोहिते, प्रा. डी.एन.दाभाडे,लातुर, शितल खोत यशस्वी उधोजक शमनेवाडी, प्रमोद पाटील, ग्राम पंचायत सदस्य बेडकीहाळ, ऍड सुदर्शन तमन्नवर चिकोडी, ऍड निरंजन कांबळे नेज, जीवन यादव,सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. 

      मनोगतामध्ये प्रा.डी.एन. दाभाडे म्हणाले की कार्यक्रम आयोजित करणे इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. आणि ते कष्ट नेहमी विक्रम शिंगाडे करत असतात. शिंगाडे हे सातत्याने सामाजिक उपक्रम निस्वार्थीपणाणे राबवत असतात. आणि हे सर्व उपक्रम आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून ते एकटे राबवत असतात. त्यांचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे ते म्हणाले.      

        प्रमोद पाटील म्हणाले की शिंगाडे हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्यामुळेच त्यांना चेन्नई युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी मिळाली. आणि ती सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी योग्य अशा व्यक्तींला मिळाली आहे. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी राहु अशी ग्वाही दिली. पुढे डॉ. सुमित्रा भोसले मॅडम म्हणाल्या की आम्ही नेहमी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो कारण की ते सर्व उपक्रम प्रामाणिकपणे निस्वार्थीपणाने राबवत असतात. या कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची कमतरता भासु नये म्हणून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आणि गोर- गरिबांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा त्या म्हणाल्या.   

     या शिबीराला डॉ. सिधनगौडा मालिबिरादर (MBBS MD Medicine DM Cardiology) ह्रदय विकार तज्ञ, डॉ. जिनेश्वर कपाले ( MBBS MS Ortho) डॉ. अनिल नायकवडी (MBBS DNB ortho) हाडांचे व गुडघेदुखी शिबीर डॉ. राहुल पाटील (MBBS DNB (Ganeral surgery) DNB Urology, मुतखडा स्पेशालिस्ट हे सर्व डॉक्टर या शिबीरासाठी लाभले होते. या महाआरोग्य शिबीरामध्ये एकुण 135 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 13 लोकांचे सर्जरी योजीत केले आहे. त्यामध्ये 6 ह्रदय विकारांचे 4 मुतखडा व पोस्डेड आपरेशन व हाडांचे फ्रॅक्चर 3 करन्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच आरोग्य कर्नाटक ए.बी.आर.के. योजणे अंतर्गत मोफत ऑपरेशन करणार असल्याची माहिती अथायु हॉस्पिटल चे कार्यदर्शी सोमनाथ भाटणकर यांनी दिली. तसेच एकुण 85 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक म्हणून नागेश शेजाळे यांचे सहकार्य लाभले.                    या कार्यक्रमास संजय कांबळे, नितीन हलकर्णी, सुभाष पाटील, संदीप माने, गजानन मगदुम, दिपक कांबळे,बाळु भुई, महादेव गिरमल, शिरीष कांबळे, अमोल जाधव, नेताजी गोरे, अरुण कांबळे, राजु कांबळे,पिंटु जाधव, रुपेश सनदी, विकास कांबळे, आलोकनाथ कांबळे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला संघटना व पी.एस‌. सी.आरोग्य केंद्र बेडकिहाळ सर्व स्टॉप उपस्थितीत होते.



थोडे नवीन जरा जुने