हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क :
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार साजणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच हेरवाड येथील रहिवाशी रोहीत परीट यांना देवून गौरव करण्यात आला.
तंत्र स्नेही, विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. साजणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते कार्यरत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी परीट यांची मोठी धडपड असते. तसेच विद्यार्थ्यांना बौध्दीक अभ्यासाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ते विविध उपक्रम शाळेमध्ये राबवून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये, अशी त्यांची भावना असल्याने त्यांच्या या उपक्रमाची दखल घेवून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार देवून गौवर करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.मा.श्री शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, रमेश आव्हाड, बबनराव रसाळ, सामाजिक कार्यकर्ते डॉ.शुभदा जोशी यांच्यासह मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.