Top News

विद्यासागर शिक्षण संस्थेचा दहावीचा निकाल उल्लेखनीय

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       सीमाभागातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेली बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या नावाला नवा लौकिक मिळवून दिला आहे. मार्च 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बोरगाव सेंटरमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या निकालात अक्षरा महाजन हिने 95.68% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, साक्षी खोत हिने 95.84% गुण मिळवून द्वितीय तर समीक्षा हवले हिने 87.04% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

तर कन्नड विभागात अक्षरा खिचडे 95.04% व संध्या मोतीचंद चव्हाण हिने 95.04% गुण मिळवून केंद्रात द्वितीय तर विद्यासागर शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे, शिवराज माळगे 92.96% गुण मिळवून केंद्रात तृतीय व शाळेत द्वितीय क्रमांक मिळवले आहे.

    मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत शाळेतून 62 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 11 विद्यार्थ्यां डिस्टिंक्शन आले आहेत तर 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये व 23 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के इतका झाला आहे.

          विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रमुख, शिक्षकवृंद व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामुळे विद्यासागर शिक्षण संस्था पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

    या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले, संचालक विद्याधर अम्मानांवर, बाबासाहेब पाटील, मलगोंडा म्हैशाळे, अनुज हावले, रावसाब तेरदाळे, शिवप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील, सुकुमार चिपरे, अशोक पाटील, बाळासाहेब कमते यांच्या सह हायस्कूल चे मुख्याध्यापक एस ए कोळी,राजू खिचडे सर शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले,

     बोरगांव केंद्रांत विद्यासागर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उच्यांकी यश संपादन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने