Top News

सक्षम पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे अब्दुललाटमध्ये उदघाटन

 


अब्दुललाट / शिवार न्यूज नेटवर्क :

     अब्दुललाट येथे सक्षम नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिस-या शाखेचे उदघाटन कृष्णकुंज इस्टेटचे प्रमुख व उद्योजक अतुल शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिल बागणे प्रमुख उपस्थीत होते. 

श्री. शिंदे म्हणाले, अत्यंत कमी काळात सक्षमची तिसरी शाखा निघत आहे. संस्थेतील पारदर्शकतामुळेच तीन वर्षात सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन केले आहे. एनपीएही शुन्य टक्के असून परिसरातील समाजाच्या उन्नतीत सक्षम पतसंस्था हि मोठी भागीदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी संस्था व संस्थाचालकांच्यावर लोकांचा विश्वास वाढतच जातो. म्हणूनच संस्था व पर्यायाने त्याचे सभासद व ग्राहक यांची आर्थिक उन्नती होत राहते. 

यावेळी नागरीकांकडून ठेवीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सरपंच सौ. कस्तुरी कुरुंदवाडे, ग्रामसेवक श्री रजपूत, माजी उपसभापती मल्लु खोत, विद्याधर कुलकर्णी, एस.के. पाटील, आप्पासो चौगुले, जे.जे.पाटील, डॉ. अरुण कुलकर्णी, राजेखान शेख, अशोक पाटील, अब्बास नदाफ, रावसाहेब पाटील (नांगरे), शांतिनाथ मगदूम, सुरेश देवमोरे, प्रितम पाटील, राहूल गौराई, आर.के.पाटील, स्वप्निल सांगावे यासह गावातील सर्व सेवासंस्था, आर्थिक संस्थेचे पदाधिकारी, सेवक यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी सक्षम पतसंस्थेचे उपाध्यक्ष महावीर खवाटे यांच्यासह सर्व संचालक, सेवक उपस्थीत होते. 

 

थोडे नवीन जरा जुने