अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
श्रावण महिन्यातील देवदर्शन घेण्यासाठी कर्नाटकातील हावेरी येथील रुद्रप्पा अंगडी कुटुंब कल्लापुर येथील बसवेश्वर देवस्थानला पहाटेचे कार ने जात असताना इलकल हुन हुबळीकडे जानाऱ्या कर्नाटक बसला समोरासमोर झालेल्या धडकेत जागीच तीन जण ठार तर एकाचा उपचारांती मृत्यू झालेची घटना गदग जिल्ह्यातील कोंनुर येथे घडली आहे,
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस इलकल हुन हुबळीकडे जात असता, देवदर्शन करून परत येणाऱ्या कारला समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण व भयानक झाला की कार चा चक्काचूर झाला असून कार मधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नुर गावाशेजारी घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील रूद्रप्पा अंगडी वय वर्ष 55, पत्नी राजेश्वरी वय 45, मुलगी ऐश्वर्या वय वर्ष 16, मुलगा विजय वय 12 अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळी नरगुंद पोलीस स्टेशनचे पीएसआय भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेची नोंद नरगुंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. अधिक तपास नरगुंद पोलीस स्टेशन करीत आहेत.
