शेडशाळ / शिवा न्यूज नेटवर्क :
आपल्या सुरक्षिततेसाठी आपले जवान सीमेवर आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्यासाठी लढत असतात. त्यांना त्यांचे सणवार साजरे करता येत नाहीत. रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या प्रेमाचा सण. आपल्या लाडक्या बहिणींच्या कडून त्यांना रक्षा बंधनासाठी गावी येता येत नाही यासाठी आपली एक सामाजिक बांधिलकी आहे हे लक्षात घेऊन न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळच्या विद्यार्थ्यांना जवानांच्या साठी राखी बनवून आणण्याचे आवाहन केले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी या जवानांना देण्यासाठी स्वतः विविध प्रकारच्या आकर्षक अशा राख्या तयार केल्या. मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांना या राख्या सुपूर्द केल्या. विद्यालयातील कलाशिक्षक श्री सत्यजित पाटील यांनी त्या आकर्षक रित्या सजवल्या व शेडशाळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप कांबळे सर यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
