शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे पायाभूत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे विविध प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील विद्यार्थीनी राज्यस्तरावर चमकत आहेत. याचा शिरोळकरांना सार्थ अभिमान आहे.शाळेच्या प्रगतीसाठी रोटरीच्या माध्यमातून सहकार्य करू.असे आश्वासन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी मेजर प्रा.के.एम.भोसले यांनी दिले.
येथील कन्या विद्या मंदिर नं.२ शिरोळ या शाळेत रोटरी क्लब ऑफ शिरोळ,रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी,शिरोळच्या नूतन पदाधिकारी व शाळेतील गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार समारंभ संपन्न झाला.या समारंभात प्रा. भोसले यांनी मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनिल बागडी,सेक्रेटरी. डॉ.अंगराज माने,ट्रेझरर दिनेश गावडे तसेच रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या), सेक्रेटरी मेजर प्रा.के.एम. भोसले,ट्रेझरर तथा पत्रकार चंद्रकांत भाट यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ऋणानुबंध व प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष धनंजय नाईक,सदस्य अभिजीत गुरव, सदस्य सौ.मनीषा कुंभार, शिक्षणतज्ञ राजेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ते वीरसिंह पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक नूरमहम्मद मुल्ला शाळेचे मुख्याध्यापक हरिदास घोळवे, शिक्षक सौ.वहिदा मुल्ला, श्रीमती राजश्री टोणे,धनाजी आवळे,श्रीमती दिपमाला कोळी व सौ.राजश्री रावळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश नलवडे यांनी केले तर श्री.सरगर यांनी आभार मानले.
