अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
नुल तालुका गडहिंगलज येथील जवान अमर भिमगोंडा देसाई वय वर्षे 39 यांना राहत्या घरात पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी रात्री जवानाचे हात पाय बांधून तोंड व नाकावाटे विष पाजण्याचा प्रकार घडला होता, यावेळी जवान अमर यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने बचावला होता.शेजाऱ्यानी जवानाला कोल्हापूर येथील सी पी आर या रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी उपचार दरम्यान प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, परंतु विष चे प्रमाण अधिक अंगात शिरल्याने पुन्हा जवानाला पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु शनिवारी रात्रीच्या सुमारास उपचार सुरू असताना जवानाचे निधन झाले.
पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने पतीचे हातपाय बांधून वीष पाजण्यात आलेल्या सैन्य दलातील जवान अमर भिमगोंडा देसाई राहणार नुल् तालुका गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांचा पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारे त्यांचा मृत्यू झाला आहे . याप्रकरणी अमर देसाई यांची पत्नी तेजस्विनी देसाई व प्रियकर सचिन राऊत यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी त्यांच्यावर दाखल झालेला आहे. तेजस्विनी देसाईला हिला अटक केली असून तिचा प्रियकर राऊत यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जवान देसाई यांच्यावर आज सोमवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या गावी नुल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
देश सुरक्षित रहावा यासाठी आपले जवान जीवाची बाजी करून सेवा बजावीत असताना व आपल्याला एक सुरक्षितता प्राप्त करून देत असतात परंतु अमर देसाई या जवानावर हा जीवघेणा हल्ला त्यांच्याच पत्नीकडून झाल्याने त्या क्रूर आरोपीवर कठोर अशी कारवाई व्हावी, अशी नागरिकातून बोलले जात आहे.
