अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील जोड कुरळी या गावातून घटप्रभा हा कालवा गेला असून या कालव्या मध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कालवा भरून वाहत आहे, अरुण खददी हा चार वर्षाचा बालक कालव्याच्या परिसरात खेळत होता, तो कालव्या जवळून जातांना पाय घसरून कालव्यात पडून मृत्यू झाला आहे. ही घटना चिकोडी तालुक्यातील जोड कुरळी या गावात घडली आहे , अरुण खड्डी हा चार वर्षाचा बालक आपल्या सभोवतालच्या कालव्याच्या परिसरात खेळत होता तो कालव्या जवळून जात असताना त्याचा पाय घसरला, कालव्यामध्ये पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं निदर्शनास आले आहे. सदर घटनेची चिकोडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.अधिक तपास पोलीस स्टेशन करीत आहे, अरुण खद्दी या चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू ची बातमी समजताच जोडकुरळी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
