कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड बार असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या वकिलांच्या बैठकीमध्ये चालू वर्षी कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ॲडवोकेट अनिरुद्ध कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
ॲडवोकेट अनिरुद्ध कांबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कायद्याचा अभ्यास करून वंचित व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी कुरुंदवाड, जयसिंगपूर या ठिकाणी ते वकिली व्यवसाय करत आहेत. वकिलांच्या व्यवसायातील अडी - अडचणी सोडवण्यासाठी तसेच सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन कुरुंदवाड बार असोसिएशनने त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीने शिरोळ तालुक्यासह कुरुंदवाड, हेरवाड परिसरामध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे.
यावेळी ॲड. देवराज मगदूम, ॲड प्रकाश भेंडवडे, ॲड ए बी भुजगुडे, ॲड. ए डी कलण्णावर, ॲड .व्ही आय जमदणगी, ॲड एन जे पाटील, ॲड . व्ही एस सुतार, ॲड बी. वाय. पाटील आदी उपस्थित होते.
