Top News

ढोणेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पाळणा घराचे उद्घाटन


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

         ढोणेवाडी ग्राम पंचायती मार्फत राष्ट्रीय हमी योजने अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या "कुशीन मने" तथा पाळणा घराचे उद्घाटन फित कापून ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. गीतांजली विजय माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

       रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामात मोल मजुरी करणाऱ्या कामगारांच्या लहान मुलांची देखभाल करण्यासाठी शासना मार्फत या कुशन मने तथा पाळणा घरांची कार्य शाळा सुरू केली आहे.या पाळणाघरा मार्फत राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या कामास येणाऱ्या सर्व मजुरांच्या लहान गटातील मुलांची देखभाल करणे,त्यांच्यात प्राथमिक शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांचे तात्पुरते संगोपन करण्याच्या उद्देशाने या पाळणाघरांची निर्मिती केली असून अशा या पाळणाघराचे उदघाटन आज सोमवार दिनांक 12 रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत सरपंचांनी केलं आहे.

             शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या पाळणाघरा मार्फत सर्व मजुरांच्या मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी हि प्रामुख्याने ग्रामपंचायती मार्फत नेमलेल्या चार महिला स्वयंसेवकींवर आहे. त्यामुळे या महिला सेवकांनी प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याची जबाबदारी पेलून शासनाने राबविलेली ही योजना सफल करावी अशी अपेक्षा ग्राम पंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांनी व्यक्त केली.

       यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासो खोत,शिवाजी नागराळे, दादासो सुतार,सौ संपदा जाधव,सौ कस्तूरी दुगाणे,सौ तायव्वा बारवाडे, ग्राम विकास अधिकारी सुरज इंगळे,तानाजी जाधव,विजय माने,उत्तम माने,खानू दुगाणे,रवी चौगुले,भिमराव खोत,संतोष हजारे, संजय बुडके,मलगोंडा सदलगे,संजय खोत,ओंकार घाटगे,शिवानंद सादळकर, सिद्धा बारवाडे (दुगाणे ),अनिल कांबळे,चिंचा कांबळे,प्रवीण कांबळे, महिपती खोत,रोहिदास जाधव अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.


थोडे नवीन जरा जुने