Top News

बोरगाव येथे के. एस. पाटील हायस्कूल मध्ये डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

         बोरगाव येथील के एस पाटील हायस्कूलात प्रा .अण्णाप्पा शिरदवाडे व निवृत्त प्राचार्य सरदार अफराज दाम्पत्याच्या वैयक्तिक दानातून निर्माण करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उदघाटन उपस्थित दानशुर व्यक्तींच्यासह संस्था संचालकांच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे होते.

      आजची युवा पिढी ही पुस्तकी लायब्ररींकडे न वळता आधुनिकीकरणाच्या जगात डिजिटल फॅसिलिटी दुनियेकडे वळण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसू लागला आहे.त्यामुळे इतरत्र देशात मिळणारे ज्ञानार्जन हे अशा डिजिटल शिक्षणामुळे ते आपल्या स्व-देशीही खेड्यापाड्यात घेणे शक्य झाले आहे.आणि म्हणूनच बोरगाव सारख्या ग्रामीण भागात आपण अशी ही डिजिटल शाळा सुरू करावी हा उदात हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रा.अण्णाप्पा शिरदवाडे व निवृत्त प्राचार्य सरदार अफराज, दाम्पत्यांच्या वैयक्तिक अनुदानातून उपयुक्त साहित्य आणून हे डिजिटल क्लासरूम या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे.शिवाय अशा या डिजिटल क्लास रूमसाठी या शिक्षण संस्थेतून सन 1978 साली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या वर्ग मित्रांच्या वर्गणीतून डिजिटल रूममधील लागणाऱ्या आसन व्यवस्थेची सुव्यवस्था केली आहे.त्यामुळे कृतज्ञतापर आयोजित कार्यक्रमांमध्ये या उपस्थित दानशूर व्यक्तींचा संस्थेकडून कौतुकस्पद गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी निवृत्त प्राचार्य सरदार अफराज,सौ हमिदा अफराज,सौ.राजश्री शिरदवाडे,शिक्षण संघाचे उपाध्यक्ष मनोजकुमार पाटील,संचालक अशोक अम्मन्नवर,शांतिनाथ लगारे,महावीर नरवाडे,वसंत भिकू,महावीर घाळे,दादा गुरव,रावसाहेब घोरपडे,शोभा देशपांडे ,शोभा कोत्तलगे, मुख्याध्यापक ए.ए .धुळासावंत ,आदिनाथ हावले ,यांच्यासह शाळा पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विनोदिनी आलासे यांनी सूत्रसंचालन केले .तर बी.के. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने