Top News

बोरगाव येथे श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाचे थाटात उद्घाटन


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव येथे श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना ली निपाणी या मल्टीस्टेट कारखान्याच्या बोरगांव येथील शेती विभागीय कार्यालयाचे उदघाटन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

        निपाणी येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना हा सध्या मोठ्या गाळप क्षमतेचा व इथेनॉल निर्मित उत्पादित मालाचा सहकारी मल्टीस्टेट साखर कारखाना म्हणून प्रचलित आहे.अशा या साखर कारखान्यास बोरगावसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, या बरोबरच सर्व शेतकरी बांधवांना साखर कारखान्याच्या विविध योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने माजी खासदार अण्णासाहेब जोले यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव या ठिकाणी हे शेती विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे . आज या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले.

        यावेळी उदघाटक म्हणून बोलताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाण्यास आपण सर्व शेतकरी बांधवांनी उत्तम प्रतीचा ऊस पुरवठा करून गळीत क्षमता वाढवण्यास सहकार्य केल्यास हा साखर कारखाना संपूर्ण कर्नाटक-महाराष्ट्र राज्यात एक आदर्शवत साखर कारखाना ठरेल अशी अशा व्यक्त केले. या कारखान्याने अल्पावधीतच गरुड झेप घेतली असून सभासदांचेहि हित जोपासण्यास कटिबध्द आहे.यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक श्रीकांत बन्ने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

        याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक शरद जंगटे, रामगोंडा पाटील, जयकुमार खोत, श्रीकांत बन्ने, रमेश पाटील, सुरेश खोत, आण्णा पाटील,दादासो भादुले, शिवाजी भोरे ,उत्तम कदम ,युनूस मुल्ला,बाबासाहेब चौगुले, अमित माळी ,जितेंद्र पाटील ,शेशू ऐदमाळे, महिपती खोत, अजित तेरदाळे, ,मुरारी ऐदमाळे, , अजित कांबळे, जितेंद्र अम्मान्नवर, संजय पाटील, बाजीराव कोळी, राजू भदरगडे, बबन रेंदाळे, राजू लठलठे यांच्यासह हालसिद्धनाथ कारखान्याचे पदाधिकारी,मान्यवर, भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने