Top News

कुरुंदवाडसह परिसराला पावसाने झोडपले



अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

 कुरुंदवाडसह परिसराला रविवारी रात्री आठच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने सुमारे अर्धातास अक्षरशः झोडपुन काढले.

   पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा या आठवड्यात उन्हाळ्यासारखा उष्मा जाणवत होता. गेले दोन चार दिवस उष्माने तर कहरच केला होता.यामुळे ग्रामस्थ उष्माने हैराण झाले होते.  रविवारी सांयकाळी सातनतंर विजांचा कडकडाट सुरु झाला . रात्री आठ वाजता जोराचा पाऊस सुरु झाला.काही वेळातच मुसळधार पावसामुळे घरासमोरील गटारी,ओढे,नाले भरुन वाहु लागले. वादळ,वारे नसल्यामुळे धो धो पाऊस पडला. पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.रात्री साडेआठ नतंर पाऊस थांबला तरी बराच वेळ विजांचा कडकडाट सुरुच होता. पावसाळ्यातसुध्दा विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने ग्रामस्थामधुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने गेले चार दिवस उष्माने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.



थोडे नवीन जरा जुने