Top News

जानकी वृध्दाश्रमात पार पडला माणुसकीच्या रक्षाबंधनाचा सण



घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 ह्या धकाधकीच्या जीवनात देखील अजून माणसांमध्ये देवपण शिल्लक असल्याची जाणीव आज जानकी वृद्धाश्रम घोसरवाड मध्ये झाली. रक्षाबंधन,भाऊबीज,पाडवा ह्या दिवशी आश्रमातील सर्व आजी-आजोबा त्यांच्या नातेवाईकांची व त्यांच्या बहिणींची आठवण काढून रडत असतात.

    प्रत्येकाला असे वाटत असते की आज राखी पौर्णिमा आहे व राखी बांधण्यासाठी माझ्या बहिणी येतील व मला राखी बांधतील या आशेने ते सकाळपासून रस्त्याकडे एकटक नजर लावून बघत होते.

             काही वेळाने सकाळी दहाच्या सुमारास जानकी वृध्दाश्रमाच्या देणगीदार शर्मा मॅडम यांच्या कुटुंबातील त्यांच्या आई व चार मावश्या कोणतीही कल्पना न देता भाड्याची गाडी करून जानकी वृद्धाश्रम मध्ये दाखल झाले व त्यांनी आश्रमातील सर्व आजी-आजोबांना खाऊ दिले.आजोबांना ओवाळून त्यांच्या हातामध्ये आपुलकीची व दीर्घायुष्य राहण्यासाठी राखी बांधली तेव्हा आश्रमातील आजोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.त्यांच्या रक्तातील कोणीही नातेवाईक आले नाहीत पण त्यांच्यापेक्षाही माणसात देवपण असणाऱ्या रामकन्या बाई शर्मा,सरस्वतीबाई शर्मा,बसंतीबाई शर्मा,गीताबाई शर्मा,कंचन शर्मा व संगीता शर्मा ह्या सर्व वेगवेगळ्या भागात राहतात. म्हणजे कोण पश्चिम बंगाल,कोण मुंबई,कोण पुण्यात, कोण जयसिंगपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. पण आज एकत्र येऊन जानकी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर सुखद व त्यांच्या मनाला धीर देऊन एक चांगल्या प्रकारे राखी पौर्णिमा साजरी केली.त्याबद्दल सर्व शर्मा कुटुंबियांचं जानकी परिवारातर्फे मनापासून धन्यवाद दिले. समाजात आजही रक्ताच्या नात्यापेक्षाही मानवतेचे नाते सर्वश्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

थोडे नवीन जरा जुने