Top News

शाहू पतसंस्थेची १०० कोटींच्या दिशेने वाटचाल : ज्येष्ठ संचालक दादासाहेब पाटील

 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

       सहकारातील कामकाजात उत्कृष्ट 'शाहू पॅटर्न' उदयास यावा यदृष्टींने सहकार कायद्यातील नविन धोरणांची अंमलबजावणी काटकसरीचे धोरण व पारदर्शक व्यवस्थापनामुळे संस्थेस सन 2023-24या आर्थिक वर्षात 1 कोटी,3लाख,69हजाराचा निव्वळ नफा झाला आहे.संस्थेने 100 कोटीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे प्रतिपादन संस्थेचे ज्येष्ठ संचालक माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केले.

          दरम्यान शिरोळ तालुका महापुराने ग्रासले आहे.तरी तालुका 100 टक्के पूरग्रस्त जाहीर करण्यात या मागणीचा ठराव मांडण्यात आला.सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

          येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचा 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण आलासे होते.प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.सीमेवरील जवान,कोरोना काळात निधन झालेले ज्ञात-अज्ञातांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

      चेअरमन किरण आलासे  प्रास्ताविकात बोलताना संस्थेचे सचिव संजय गजन्नावर म्हणाले संस्थेने लेखपरिक्षणात सातत्याने  अ वर्ग मिळाला असून प्रत्येक वर्षी नफ्यातील वाढीचा आलेख चढता राहून या वर्षीही संस्थेला 1कोटी,13लाख,873हजाराचा ढोबळ नफा झाला आहे संस्थेकडे भाग भांडवल 2 कोटी 63लाख 73हजार आहे. राखीव निधी 8कोटी 6लाख 14हजार रुपये आहे.ठेवी 93कोटी 66 लाख 53 हजार  रुपये असून कर्जे 54 कोटी 99लाख 96 हजार दिली आहेत. संस्थेचा एन.पी.ए 0 टक्के असल्याचे संस्थेचे सचिव  यांनी सांगितले.

        यावेळी संस्थापक माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील,व्हा.चेअरमन रावसो उगारे, सुषमा उपाध्ये, संचालक जिनगोंडा पाटील,धनपाल कोथळे,महावीर पोमाजे,दौलत कांबळे,धोंडीराम चौगुले,आण्णासाहेब गुदले,विजय जोग,पद्मराणी पाटील,आयेशा बागवान,बाळासाहेब नाईक,अक्षय आलासे,मोन्नाप्पा चौगुले,आण्णासो चौगुले सह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार राजाराम कदम यांनी मानले.


 

थोडे नवीन जरा जुने