Top News

दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार 2024 जाहीर

 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे १४ ऑगस्टला होणार पुरस्काराचे वितरण 



 कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवार,दि. 14 ऑगस्ट रोजी दू. ३ वा.  राजर्षी शाहू स्मारक भवन येथे   देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उंतुंग कामगीरी करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार 2024 ने सन्मान करण्यात येणार असून दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांच्या पत्रकारीतेच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गायन सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध क्षेत्रातील व्यक्ती,संस्थांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे व संतोष आठवले यांनी दिली .

या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे ,एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय ए . नाईक,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुप्रिया देशमुख ,अँटिकरप्शन च्या पोलीस निरीक्षक अस्मा मुल्ला ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे ,शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर निलेश बनसोडे ,डीआरडी चे जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटणकर ,आंतरराष्ट्रीय स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सतीश पत्की 'जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक ) एकनाथ आंबोकर ,आधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार, आहेत

थोडे नवीन जरा जुने