Top News

दारूच्या नशेत मुलाकडून आईची हत्या ; बैलहोगल तालुक्यातील उडिकेरी येथील घटना

 

संशयित आरोपी इरांना गुरप्पा टेलांगी

 

  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  मानवी जीवनाला हुलकावणी देणारी घटना बेळगांव जिल्हातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी येथील इरांना गुराप्पा तेलांगी या अमानवी दारुड्याने शेती नावावर करून देत नसल्याने दारूच्या नशेत स्वतःच्या आईला काठीने मारहाण करून तिचा खून केला आहे. दोडवाड या पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. घटना स्थळवरून मिळालेली अधिक माहिती अशी की दारूच्या नशेत मुलाने आईची हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैल होंगल तालुक्यात उडी केरी या गावात घडली आहे. महादेवी गुराप्पा तेलंगी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. साधारण तिचे वय वर्षी 70 आहे . मुलगा इरांना गुरप्पा टेलांगी वय वर्षे 34 असून त्याने दारुच्या नशेत स्वतःच्या आईला काठीने मारहाण करून खून केला आहे.

       इरांना याला दारूचे व्यसन होते, दररोज त्याने आपल्या आईला पैशासाठी नाहक त्रास देत होता, शेती व पैसा स्वतःकडे ठेवण्यासाठी आईकडून वारंवार मागनि करीत होता, शेती आपल्या नावावर न केल्याने रागाच्या भरात इरांना याने दारूच्या नशेत आईला मारहाण करून तिचा खून केल्याची घटना बैलहाँगल तालुक्यातील उडी केरी या गावात घडली आहे .

   घटनास्थळी डीवायएसपी रवी नाईक, पीएसआय नंदेश, प्रवीण कोटी, व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन ईराणा टेलंगी या आरोपीला अटक केली आहे. सदर गुन्ह्याची नोंद गोडवाड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून अधिक तपास गोडवाड पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने