Top News

हेरले येथील यादगार चौक येथे अल्पसंख्यक फंडातून रस्ता व गटारीचा शुभारंभ



संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे राजर्षी छत्रपती शाहू स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी हेरले यांच्या माध्यमातून हेरले गावचे माजी डे. सरपंच मा.बक्तीयार जमादार यांच्या विशेष प्रयत्नाने अल्पसंख्यक फंडातून

 यादगार चौक येथे काँक्रिटीकरण रस्ता व आदिनाथ नगर गटर व रस्ता तांबेकर गल्ली रस्त्याचा शुभारंभ वॉर्ड क्र. 5 मधील कामाचा श्रीफळ वाढवून करण्यात आला.हा कार्यक्रम यादगार चौक माळभाग येथे आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शाहू ग्रामविकास आघाडीच्या पॅनलचे नेते जवाहर पतसंस्थेचे चेअरमन माजी सरपंच बालेचांद जमादार कार्यक्रम प्रसंगी हेरले ग्रामपंचायत सदस्य , उर्मिला कुरणे, सविता पाटील, माजी सभापती पंचायत समिती जयश्री कुरणे,अमित पाटील, अर्जुन पाटील, अमीन बारगीर, अमित परमाज, शुभांगी चौगुले, बाळगोंडा पाटील, राहुल चौगुले, मिलिंद इंगळे, सुमन चौगुले, कृष्णात कटकोळे, मच्छिंद्र लोकरे, मुबारक खतीब, राजू खतीब, अल्लाउद्दीन खतीब, अमोल राजमाने, अंजुम देसाई, वाशिम खातीब, कासिम मुल्ला, तोफिक जमादार, कार्यकर्ते व अन्य नागरिक उपस्थित होते.


 

थोडे नवीन जरा जुने