Top News

मंदिर स्वच्छ करताना विजेचा धक्का बसून दोन महिलांचा मृत्यू

 


  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

   राष्ट्रीय महामार्गाजवळ लगत असणाऱ्या बेळगांव तालुक्यातील सुळेभावी गावात काल सोमवारी संध्याकाळी बचत गटाच्या महिला सदस्य सविता फकीराप्पा ओन्ती (वय वर्षे 34) व कलावती मारुती बिरदवाडी (वय वर्ष 41) या महिला श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने येथील महर्षी वाल्मिकी देवस्थान परिसर स्वच्छ करीत असताना त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना मारिहार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.                             

  घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सुळेभावी गावातील काही महिला बचत गटाची सभा घेण्यासाठी महर्षी वाल्मीकी मंदिरात मीटिंग बोलावली होती. मीटिंग आटोपून श्रावण सोमवार असल्याने देवस्थान स्वच्छ करू लागल्या, मंदिरात स्वच्छ करताना काम आटपून लोखंडी गेटचा दरवाजा बंद करत असताना प्रथमतः सविता या महिलेला विद्युत विजेचा स्पर्श होऊन ती जागीच ठार झाली. सविताला वाचवताना कलावती या महिलेला विजेचा जोरात धक्का बसून ती बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारांती तिचा मृत्यू झाला. दुर्घटना ठिकाणी नजीकच्या मारीहाळ पोलीस स्टेशनचे पीएसआय मंजुनाथ नाईक यांनी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली.

     यावेळी कर्नाटकच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनेची पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या महिलांना सरकारकडून परीहार निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.                                      

     हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण महिना, काल सोमवारी मंदिरातील साफसफाई करताना दोन महिलाना विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने सुळेभावी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. मारीहाळ पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस अधिकारी करित आहेत.                     

थोडे नवीन जरा जुने